Walmik Karad ला भेटण्यासाठी अनोखी शक्कल; CID च्या नावाने सरपंच घुसला बीड पोलिस ठाण्यात

वाल्मिक कराडला भेटण्यासाठी माजी सरपंचाने चक्क सीआयडीच्या नावाने बीड पोलिस ठाण्यात प्रवेश मिळवला.
Published by :

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. दररोज या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. वाल्मिक कराडला भेटण्यासाठी माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी अनोखी शक्कल लढवली. सीआयडीच्या नावाने माजी सरपंच बीड पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणावरून एकच खळबळ उडाली आहे.

अटकेतील वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगाव येथील माजी सरपंच बालाजी तांदळेने आपण सीआयडीचा वाहनचालक असल्याची बतावणी केली. तसेच बेट बीड शहर पोलिस ठाण्यात प्रवेश मिळवल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर खुनाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेले धनंजय देशमुख यांना अरेरावी केली. महिला पोलिसाशीही त्याने हुज्जत घातल्याची तक्रार धनंजय देशमुख यांनी एसपींकडे केली आहे. तांदळेने कराडची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी तक्रारीत करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com