Sindhudurg Fort : पाच रुपयांवरुन चाळीस महिलांमध्ये तुफान राडा!

साता-यातील एका महिलांच्या ग्रुपची आणि मालवण येथील स्थानिक महिलेची शुक्रवारी मारामारी झाला.

सिंधुदुर्ग : कर देण्या-घेण्याच्या वादातून साता-यातील एका महिलांच्या ग्रुपची आणि मालवण येथील स्थानिक महिलेची शुक्रवारी मारामारी झाला. दाेन्हीकडून केस धरुन एकमेंकांना मारहण करण्यात आली. हे प्रकरण पाेलिसांपर्यंत गेल्यानंतर साता-याची महिलांना नमते घेत मालवणातील कर आकारणी करणा-या महिलांची माफी मागितली. या मारामारीचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहे.

घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मालवणात सातारा येथून आलेल्या महिला पर्यटकांची आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे पर्यटन कर घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची हाणामारी झाली. किल्ले सिंधुदुर्ग येथे पर्यटनासाठी साताऱ्यावरून एक ग्रुप आला होता. यावेळी त्या ग्रुपमधील महिला पर्यटकांनी कर देण्यास नकार दिला व कर आकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com