व्हिडिओ
Congress : पुण्यात काँग्रेसला दुसरा धक्का, युवा नेते रोहन सुरवसे पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, युवा नेते रोहन सुरवसे पाटील राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत, 100 पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देणार.
काही दिवसांपुर्वी पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनामध्ये पक्षप्रवेश केला. अशातच पुण्यातील आणखी एक नेता काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस युवा सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. रोहन सुरवसे पाटील यांच्यासोबत 100 पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची ही माहिती मिळत आहे.