Supriya Sule: राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह अजितदादांना, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला.
Published by :
Dhanshree Shintre

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळाला आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अदृश्य शक्तीचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी भाजपकडे बोट केले आहे. जे षडयंत्र बाळासाहेबांच्या विरोधात झाले तेच आज पवार साहेबांसोबत झालं आहे. निवडणूक आयोगाकडून हाच निकाल अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. जे शिवसेनेसोबत केलं तेच राष्ट्रवादीसोबत केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com