व्हिडिओ
Palghar Accident News : डहाणू धुंदलवाडी मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू 2 जण जखमी
डहाणू धुंदलवाडी मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू आणि 2 जण जखमी. अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू, दुसरे दांपत्य गंभीर जखमी झाले.
Summary
पालघरमधल्या डहाणूमध्ये भीषण अपघात झाला आहे. एक दापंत्य मोटारसायकलवर घरी परतत असताना, धुंदलवाडी मार्गावर समोरून वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुण जिग्नेश रघु भुयाल याचा जागीच मृत्यू आहे.
तर दुसऱ्या मोटरसायकल वरील दांपत्य गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने दापत्यांसोबत असलेल्या लहान मुलाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.