Amravati : अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कुपोषणानंतर खडीमलचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशपातळीवर पोहोचला.
Published by :
Dhanshree Shintre

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कुपोषणानंतर खडीमलचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशपातळीवर पोहोचला. पाणीपुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात आदिवासी महिलांना सर्व कामे चातकासारखी पिण्याच्या पाण्याची वाट पाहावी लागते.

खडीमल येथे महिला, मुले विहिरीतून हंडाभर पाण्यासाठी दिवसभर राबत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे दावे फोल ठरल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राहुल येवले यांनी केला आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईची दाहकता वाढत असतांना शासन प्रशासनाद्वारा गांर्भियाने घेतल्या जात नसल्यानेच पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचा आरोप येथील आदिवासी बांधवांनी केला आहे.

जिल्ह्यात 65 गावात विहिरी अधिग्रहित केल्या असून 13 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, अमरावती जिल्ह्यात पारा 44 डिग्री गेला असताना एवढ्या उन्हात पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तर दुसरीकडे राजकीय पुढारी निवडणूकीत व्यस्त आहे. अमरावतीत मतदान संपलं, त्यामुळे आमची गरजही संपली काय त्यामुळेचं दुर्लक्ष केलं असा देखील आरोप होतो आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com