Shambhuraj Desai On Sanjay Raut: संजय राऊत लवकरच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाणार
शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील नेत्यांवर खोचक टोला लगावला होता. संजय राऊत म्हणाले की, मंत्रिमंडळ म्हणजे वेड्यांचा बाजार आहे. संजय राऊतांनी केलेल्या या टोल्यावर प्रत्युत्तर देत असताना शंभुराज देसाई म्हणाले की, त्यांना आता फेस रिडिंग वैगरे येत का.. मी मागे म्हणालं होत चुकीची चिठ्ठी काढणार कोपट, तसंच आता चुकीचं फेस रिडिंग करणारा कुडमुड्या जोशी खेडेगावात असतो...
तो त्याचं डुमडुम वाजवत येतो आणि चेहरा बघून भविष्य सांगणार असं बोलत फिरतो आणि ह्याच्या त्याच्या मनातलं सांगत फिरतो... ते सगळं खोट असत... तसंच हे संजय राऊत पण खोटे चेहरे वाचायला लागले आहेत. आता ते चिठ्ठी काढायचे बंद झालेत, आता त्यांना चेहऱ्यावरून समजतं कोण वेडा आहे, कोण शाहणा आहे...
संजय राऊतांना आता थोड्या दिवसांनी प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यामध्ये एक मेंल हॉस्पिटल आहे, त्या मेंल हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बुक करुन ठेवा... कारण तिथे संजय राऊतांना लवकरचं भरती कराव लागणार आहे... त्यांना आता दिवा स्वप्न पडायला लागले आहेत, हळूहळू ठाण्यातील मेंल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या वाटेवर संजय राऊत आहेत.