Shambhuraj Desai : मुंबईतील अतिवृष्टीचा फटका आरक्षणाच्या बैठकीला,शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया

मुंबईतील अतिवृष्टीचा फटका ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला बसला आहे. आरक्षणाच्या संदर्भातची आजची सर्वपक्ष बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबईतील अतिवृष्टीचा फटका ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला बसला आहे. आरक्षणाच्या संदर्भातची आजची सर्वपक्ष बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. आरक्षणाबाबत आता उद्या सर्वपक्ष बैठक होणार आहे.

यावर शंभूराज देसाई प्रतिक्रिया देत म्हणाले, आज सायंकाळी साडेसहा वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्ष बैठकीचे आयोजन असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु रात्रीपासून पहाटेपर्यंत पाऊस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे. अनेक लोकांना परगावावरून मुंबईमध्ये पोहचाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

सगळ्यांना बैठकीला उपस्थित राहता याव या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सोबत चर्चा करून आज जी सर्वपक्ष बैठक होणार होती ती आता उद्या त्याच वेळेवर म्हणजेच सायंकाळी साडेसहा वाजता सह्याद्री अतिथी गृहावर होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com