व्हिडिओ
NCP Sharad Pawar MLA Meeting : आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे. विधीमंडळ गटनेते निवड तसंच इतर विषयांवर चर्चा होणार आहे.
एकीकडे राज्यामध्ये ५ डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. आझाद मैदानावरील सोहळ्याला पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे. विधीमंडळ गटनेते निवड तसंच इतर विषयांवर चर्चा होणार आहे. मुंबईतील बलार्ड इस्टेट येथील पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे. जयंत पाटलांसह आमदार, मुख्य नेते उपस्थितीत राहणार आहेत. गटनेते पदावर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नाव चर्चेत असल्याची माहिती मिळतेय.