Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांना आजही दैवत मानतो, अजित पवारांनी पुन्हा घेतली चुलत्यांची बाजू

अजित पवारांनी शरद पवारांना पुन्हा दैवत मानलं, राजकीय चर्चांना उधाण.

शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा चुलत्यांची बाजू घेतली आहे. तळ्यात-मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी अस वक्तव्य केलं आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे राजकीयवर्तूळात चर्चांना उधान आलेलं आहे.

याचपार्श्वभूमिवर अजित पवार म्हणाले की, "शरद पवारांना काल ही दैवत मानतो आज ही मानतो. पण कुठे तरी आज देशाला मोदींसारखे मजबूत नेता भेटलेला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभ राहण आणि देशाची प्रगती करून घेण. जगामध्ये देशाचा मानसन्मान वाढवून घेण्याकरता त्यांना पाठबळ देण हे आपलं काम होत. म्हणून आम्ही त्याठिकाणी तसं केल. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे तुम्हीसुद्धा तळ्यात मळ्यात राहून निर्णय घेऊ नका", असं सुचक वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com