Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांत निवडणूक घेण्याची गरज नव्हती, मोदींना सभा घेता याव्यात म्हणून 5 टप्पे पाडले, असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला आहे.
Published by :
Sakshi Patil

महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांत निवडणूक घेण्याची गरज नव्हती, मोदींना सभा घेता याव्यात म्हणून 5 टप्पे पाडले, असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला आहे. मतदानांच्या टक्केवारीबाबतही पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाबाबत तक्रार असल्याचं देखील पवार यांनी म्हटलं आहे.

पहिल्या टप्प्यात मतदारांची टक्केवारी कमी आहे. कडक उन्हाळ्यामुळे मतांची टक्केवारी कमी झाली. 50% च्या आत अनेक ठिकाणी मतदान झालं असं महाराष्ट्रात कधी झालं नाही. तिसऱ्या टप्प्यात थोडी टक्केवारी वाढत जाईल. तिसऱ्या टप्प्यात मतदान चांगल होईल असं वाटतं आहे, असं शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com