Sharad Pawar यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का; माजी आमदार Vilas Lande राष्ट्रवादीत जाणार?

पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांना मोठा धक्का, माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादीत जाणार असल्याचं जाहीर, अजित पवारांची साथ सोडलेल्या अजित गव्हाणे व माजी नगरसेवकांसह पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश.
Published by :
shweta walge

विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार विलास लांडेंनी यू-टर्न घेतलाय. विधानसभेवेळी शरद पवारांची तुतारीचा प्रचार केलेल्या विलास लांडेंनी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित दादांचा झेंडा हाती घेणार असल्याचं स्वतःचं जाहीर केलंय. इतकंच नव्हे, तर निवडणुकीवेळी अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे हे वीस माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहेत. या संदर्भात अजितदादा आणि अजित गव्हाणेंचं बोलणं झाल्याचा दावाही विलास लांडेंनी केलाय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com