व्हिडिओ
Sharad Pawar NCP Symbol Inauguration: तुतारी चिन्हाचं अनावरण; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुमनताई पाटील, राजेश टोपे यांच्यासह सर्व आमदार खासदार व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील. आज आठवणीत राहिल असा दिवस. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. जनतेचं राज्य आणावं लागेल. राज्याची स्थिती बदलण्यासाठी जनतेचं राज्य आणावं लागेल. संघर्षाची सुरुवात करण्याकरता प्रेरणा देणारी ही तुतारी आहे, असे शरद पवार म्हणाले.