व्हिडिओ
Bhandara : भंडाऱ्यात आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम,मुख्यंत्री काय बोलणार याकडे लक्ष?
शासन आपल्या दारी या उपक्रमाचा आज भंडाऱ्यात कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.
शासन आपल्या दारी या उपक्रमाचा आज भंडाऱ्यात कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भंडाऱ्यात पोहोचत आहेत. सकाळी 11.30 वाजता कार्यक्रमला सुरूवात होणार आहे. दुपारी होणाऱ्या या सभेची पोलीस मुख्यालयाच्या चैतन्य ग्राउंडवर तयारी अंतिम टप्प्यातील तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या स्वागताची भंडारा शहरासह जिल्ह्यात जोरदार तयारी आहे.