“आता तोंडात घुसून…” फोटोग्राफर्सवर भडकली शिल्पा शेट्टी; व्हिडिओ व्हायरल

“आता तोंडात घुसून…” फोटोग्राफर्सवर भडकली शिल्पा शेट्टी; व्हिडिओ व्हायरल

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका इमारतीतून बाहेर पडताना दिसत होता जेव्हा फोटोग्राफर्सने तीला फोटोसाठी पोज देण्यास सांगितले.

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका इमारतीतून बाहेर पडताना दिसत होता जेव्हा फोटोग्राफर्सने तीला फोटोसाठी पोज देण्यास सांगितले. मात्र, नंतर शिल्पा रागावली आणि म्हणाली, तोंडात घुसून फोटो काढशील का? असे ती म्हणाली. शिल्पा शेट्टीचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात ती फोटोग्राफर्सशी खूप प्रेमाने वागताना दिसली आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, शिल्पा एका बिल्डिंगमधून बाहेर निघत असतानाच काही फोटोग्राफर्सनी तिला घेरलं. ते तिचे फोटो काढण्यासाठी पुढे आले. सुरुवातीला शिल्पानेही त्यांना फोटोंसाठी पोज दिली. त्यानंतर ती आपल्या कारमध्ये बसण्यासाठी जाऊ लागली. पण तेव्हाच एका फोटोग्राफरने तिला पुन्हा थांबून पोज देण्याची विनंती केली आणि याच प्रयत्नात तो शिल्पाच्या खूपच जवळ गेला. त्यामुळे ती रागावून “आता काय माझ्या तोंडात घुसून फोटो घेणार आहेस का?”असे म्हणाली हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com