Kokan Shimga : कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू, तरूणांसह प्रौढही सहभागी

कोकणातील प्रमुख उत्सव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिमगोत्सवाला जिल्ह्यात जल्लोषात सुरवात झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कोकणातील प्रमुख उत्सव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिमगोत्सवाला जिल्ह्यात जल्लोषात सुरवात झाली आहे. तरूणांसह प्रौढही उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले पहायला मिळत आहेत. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण होळीमय झाले आहे. जिल्हयात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. आजपासून प्रारंभ होणारे 'तेरसे' मोठ्या दणक्यात गावोगावी साजरा झाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com