shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अफाट श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात.

साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अफाट श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. साईभक्ताकडून शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण करण्यात आलेलं आहे. ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट दान करण्यात आलेला आहे.

या हिरेजडीत सुवर्णमुकूटाची किंमत १२ लाख ७० हजार रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्ण हिरे जडीत मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करण्‍यात आला. साईबाबांच्या चरणी अर्पण करण्‍यात आलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्‍ताने संस्थानला आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे. साई संस्थान कडून दानशूर साई भक्ताचा साईंची मूर्ती शॉल देऊन सत्कार करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com