शिवसेना अपात्रता सुनावणी जानेवारीपर्यंत लांबणार?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणी सुरु आहे. मात्र, आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण पुढील वर्षी जानेवारी पर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणी सुरु आहे. 31 डिसेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण पुढील वर्षी जानेवारी पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. विधीमंडळ अध्यक्ष कार्यालयाकडून वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे. सगळी साक्ष संपल्यावर निकाल देण्यास २० ते २५ दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com