Sanjay Raut on BJP : 'भाजप पक्ष फोडतं, विरोधकांना तुरुंगात टाकतं'

भाजपला फक्त PMLA हा एकच कायदा माहीत आहे असं शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

भाजप पक्ष फोडतं, विरोधकांना तुरुंगात टाकतं. भाजपला फक्त PMLA हा एकच कायदा माहीत आहे असं शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले. आमदार गणपत गायकवाडांनी शिंदेंवर गंभीर आरोप केलेत या वर देखील राऊतांनी टीका केली आहे. गणपत गायकवाड म्हणतात, माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. गणपत गायकवाड यांच्या आरोपानुसार आता त्याचा शोध घेतला पाहिजे. आमच्या माहितीनुसार, हा पैसा शंभर कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात अटक करता येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com