Sanjay Raut : 'सांगलीची जागा शिवसेना UBTपक्ष लढवणार' राऊतांची माहिती

सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे. सांगलीच्या जागेवर काय तोडगा काढायचा ते ठरलं आहे असं राऊत म्हणाले.
Published by :
Dhanshree Shintre

सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे. सांगलीच्या जागेवर काय तोडगा काढायचा ते ठरलं आहे असं राऊत म्हणाले. उद्यापासून तीन ते चार दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आपण असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. तसेच सांगलीत चंद्रहार पाटीलचं लढणार तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढणार असं राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत उमेदवारी जाहीर केली. त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे घेतला जाईल उमेदवार ही शक्यता अजिबात नाही. अर्थात काल थोडी फार चर्चा झाली की त्यातुन काय मार्ग काढाल पण आता त्यातुन मार्ग निघाला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत दिल्लीत काँग्रेससोबत चर्चाही केली आहे. उमेदवार मागे घेतला जाणार नाही किंबहुना मी उद्या स्वतः सांगलीत जाणार आहे. उद्या मी आणि शिवसेनेतील एख मुंबईतील टीम त्याच्यामध्ये एक समन्वय म्हणून तिथे निवडणूक समन्वय म्हणून आदित्य शिरोडकर आहेत त्यांना नेमलं आहे असे संजय राऊत म्हणाले.

भिवंडीच्या जागेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुम्ही जे म्हणत आहात की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का त्यात फारसं तथ्य नाही, भिवंडीबाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com