Kiran Samant : शिवसेनेच्या किरण सामंतांची लोकसभा निवडणुकीतून माघार

आता शिवसेनेचे किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

रत्नागिरी सिंधुदुर्ग ज्या लोकसभा मतदारसंघाचा गेल्या दिवसांपासून वाद सुरु होता, या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप दोन्ही मतदारसंघ आग्रही होते. मात्र आता शिवसेनेचे किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल रात्री उशिरा स्टेटस ठेवत त्यांनी माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील शिवसेना आणि भाजप यामधील वाद मिटले असल्याची चर्चा आहेत. मा. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अब कि 400 पार होण्याकरिता रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून किरण सामंत याची माघार घेत असल्याची ही पोस्ट आहे. त्यामुळे आता रत्नागिरी - सिंधुदूर्ग या मतदारसंघात आता चित्र स्पष्ट झालं आहे ही जागा भाजपला जाणार.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com