व्हिडिओ
Yavatmal: मारेगाव तालुक्यातील पिसगांब येथील धक्कादायक प्रकार
मारेगाव तालुक्यात सरकारच्या विकास कामांची माहिती गावागावात संकल्प रथाच्या माध्यमातून जनतेला देण्यात येत आहे.
मारेगाव तालुक्यात सरकारच्या विकास कामांची माहिती गावागावात संकल्प रथाच्या माध्यमातून जनतेला देण्यात येत आहे. संकल्प रथ पिसगांव येथे दाखल होताच पिसगाव येथील नागरीकांनी संकल्प रथ आणणाऱ्यांना प्रश्नाची सरबत्ती करताच संकल्प रथाला गावातून हाकलून लावल्याने एकच खळबळ उडाली .गेल्या चार वर्षांपासून शेतकरी शेतमजूर व नागरिक महागाई, बेरोजगारी नापिकी शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाने तालुक्यात दर एका दिवसा आड आत्महत्तेच सत्र सुरु आहे. त्यातच मोदी सरकार संकल्प रथ मारेगांव तालुक्यातील गावा गावात जात 'अच्छे दिन ' आणल्याचा बागलबुवा केला जात आहे. शेतकरी व नागरीक केन्द्र सरकारच्या कामावर किती समाधानी आहे हे नागरिकांनी संतापातून व्यक्त केले.