व्हिडिओ
Shree Janmashtmi: इस्कॉन मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या रांगा
आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटेपासून मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटेपासून मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मुंबईतील चौपाटी परिसरातील इस्कॉन मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीनिमित्त सकाळीच मंदिरात आरती देखील पार पडली. इस्कॉन मंदिरात भाविक श्रीकृष्णाच्या नामाचा जयघोष करताना दिसत आहेत.
तर हरे कृष्णा हरे हरे या नाम घोषात भाविक श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज ठिकठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त श्रीकृष्ण मंदिरांत आकर्षक अशी सजावट देखील पाहायला मिळत आहे. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह हा आज मोठ्या जल्लोषात भाविक साजरा करत असताना पाहायला मिळत आहे.