Sanjay Raut On Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे महाराष्ट्राचे बाळराजे , हाडवैद्याला आम्ही खासदार केलं

बाळराजे यांच्या खास माणसांवर भाजप आमदाराने गोळीबार केला होता. त्यांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज होती.
Published by :
Team Lokshahi

बाळराजांचा वाढदिवस राज्यभर साजरा झाला. ते हाडवैद्य आहे. त्या हाडवैद्यांना एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी खासदार केले. त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. त्यांना आमच्याही शुभेच्छा आहेत. परंतु बाळराजे यांच्या खास माणसांवर भाजप आमदाराने गोळीबार केला होता. त्यांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज होती.

गुंडाचे संघटन बनवण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी दिली गेली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायद्याची चाढ असेल तर ते कायद्याने काम करतील. ते एकनाथ शिंदे यांच्या दहशतीखाली आहे का? हे त्यांनी सांगावे असं देखील खासदार संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com