सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

रोहन नाईक, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याचे पाहायला मिळते आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने निर्मला नदीला पूर आला असून वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुके जोडणाऱ्या होडावडे पुलावर पाणी आल्याने नागरिकांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसाने झोडपले असून यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com