Santosh Deshmukh प्रकरणात मोठी अपडेट! राज्य सरकारचा मोठा निर्णय, SIT स्थापन

संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट! राज्य सरकारने सखोल तपासणीसाठी एसआयटी स्थापन केली, स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी सहभागी.
Published by :
shweta walge

बीडच्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक मोठा अपडेट समोर आला आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. एसआयटीचे प्रमुख व पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी या तपासासाठी ९ जणांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांचा समावेश देखील आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com