नाशकात कत्तलखान्याला चक्क महात्मा फुलेंचं नाव दिल्याने संताप

नाशकात कत्तलखान्याला चक्क महात्मा फुलेंचं नाव देण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तत्काळ ते नाव हटवा, नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.
Published by :

सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्टरवर व्हायरल झालं आहे. हे पोस्टर नाशिक महानगर पालिकेचं असल्याचं कळतंय. यामध्ये कत्तलखान्याला क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचं नाव देण्यात आलं आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या कत्तलखान्याला महात्मा जोतिबा फुलेंचं नाव देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असून समस्त फुले प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याचे पडसाद राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे.

नाशिक महानगरपालिकेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत मालेगावात समविचारी नागरिकांकडून अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. तत्काळ ते नाव हटवावे, आयुक्तांनी माफीनामा जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com