Somnath Suryavanshi यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच- रामदास आठवलेंचा आरोप

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोषींना शिक्षा आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
Published by :

परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला, असा थेट आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. परभणीमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली असेल, परंतु कुठलीही जीवितहानी झाली नाही. असे असतानाही केवळ आंदोलन केले म्हणून त्यांना पकडून मारहाण करणे चुकीचे आहे, असं आठवलेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रालय असतानाही आतापर्यंत परभणी घटनेवर ठोस कारवाई झाली नाही अशी खंत रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. तसंच सूर्यवंशी आणि वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं आठवले म्हणाले.

काय म्हणाले रामदास आठवले?

परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाच अपमान करण्यात आला. ही गोष्ट महाभयंकर आहे. संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे. यानंतर चळवळीत उतरलेल्या तरूणांना बेछूटपणे पोलिसांनी मारहाण करणं अत्यंत चुकीची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी चौकशी करावी आणि या प्रकरणामध्ये दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. सूर्यवंशी आणि वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी. त्यांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी मिळवी ही मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com