Mahadev Munde Murder Case: महादेव मुंंडे प्रकरणाच्या तपासाला वेग, पोलीस अधीक्षकांचं नव पथक सज्ज

महादेव मुंडे हत्याप्रकरण: परळीमध्ये नव्या पथकाने तपासाला गती दिली, पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक सज्ज.
Published by :
Team Lokshahi

बीडयेथील परळीमध्ये व्यापारी महादेव मुंडे हत्याप्रकरण तपास नव्याने सुरू करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणासाठी नवीन पथक नेमल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला आता नव्याने गती मिळाली आहे

21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांचा हत्या करण्यात आला होता. या प्रकरणाला जवळपास दीड वर्ष उलटून गेले तरीही आरोपी मोकाटच आहे तरी या खुनातील आरोपींना लवकर अटक करण्यात यावी, अशी पोलिसांकडे मागणी महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक Navneet Kanwat यांच्याकडे केली आहे.

आमदार सुरेश धस यांनीही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला आहे. याबरोबरच एक विशेष पथक देखील नेमण्यात आले असून या पथकाने परळीमध्ये झाडाझडती घेतली. त्यानंतर महादेव मुंडे या प्रकरणाच्या तपासला वेग आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com