ST Worker Strike : ऐन गणपतीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक

ST कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: ST कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी ११ सप्टेंबरला ही संपाची हाक दिली आहे. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करतील. आणि जर सरकारने ऐकले नाही तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com