व्हिडिओ
लासलगाव बाजार समितीत कडकडीत बंद, कांद्याने पुन्हा सरकारची कोंडी
सरकारच्या धोरणाचा निषेध करत आजपासून कांदा व्यापा-यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय.
मनमाड : सरकारच्या धोरणाचा निषेध करत आजपासून कांदा व्यापा-यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. ऐन गणेशोत्सवात व्यापा-यांनी पुकारलेल्या या बंदमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय.
