व्हिडिओ
मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त करण्यात गैर काय? मुगंटीवारांचे विधान
अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्या विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
नागपूर : माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच, भाजप नेते सुधीर मुगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त करण्यात गैर काय, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.


