व्हिडिओ
Sudhir Mungantiwar | मंत्रिपद हुकलं पण संघटनेची जबाबदारी मिळणार का? मुनगंटीवार म्हणाले...
सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रिपद हुकले, पण त्यांनी नाराजी नाकारली. पक्षाने दिलेल्या जबाबदारीसाठी ते तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपचे 19 शिवसेना शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार गटाच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. या विस्तारानंतर तिन्ही पक्षातील नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांची नावे आहेत. अशातच भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहेत. यावरच उत्तर देत मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, "मी व्यथित असण्याचे कारण नाही. जेही पद मला पक्ष देतात, त्या पदासाठी मी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे की, मंत्रिमंडळात माझं नाव असं सांगण्यात आलं होतं, पण काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत ते होते, पण नंतर ते का कमी करण्यात आलं, हे मला माहित नाही."