Sudhir Mungantiwar : वजन वापरून माझी उमेदवारी थांबवा; सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रपुरात आले होते. यावेळी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य केलं.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नव्या संसदेत चंद्रपूरचे सागवान लागले आहे. संसदेची दारे इथल्या लाकडाची आहेत. या दारातून मला आत जावे लागू नये, यासाठी आपण आपले वजन वापरावे, अशी विनंती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com