Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज भरणार, फडणवीस, बावनकुळे उपस्थित राहणार

चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरणार आहेत. दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी अर्जाआधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भित्तीशिल्पापासून रॅलीला सुरुवात होणार असून गांधी चौकात छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपुरात मुनगंटीवारांच्या विरोधात धानोरकर उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com