महायुतीत अजितदादांची अडचण होतीय का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
बारामती : महायुतीत सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी निधी वाटपावरुन आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचंही समजत आहेत. यावर आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला या सरकारबाबत फारशी माहिती नाही. मात्र, राज्यात सध्या पाण्याचं सगळ्यात मोठ आव्हान आहे. मी पाण्याबाबत आज आढावा घेतला. त्यामुळे पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न राज्यापुढे आहे. हमीभावाची आव्हाने आपल्या समोर उभे आहेत. त्यासोबतच महागाई आणि बेरोजगारी हे खूप मोठी आव्हाने राज्यासमोर उभे आहेत. तसेच निवडणूक आयोगाची लढाई आणि सुप्रीम कोर्टातील केस यामुळे मी व्यस्त असते. यामुळे याबाबत मला काही जास्त माहित नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन असणारा खोके सरकार काय करताय याबाबत मला माहिती नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.