Supriya Sule On Beed Case: सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा, बीड प्रकरणात सुप्रिया सुळे यांचा संताप
अनेकजण मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत.सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा.. अशोक चव्हाण यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता, मग आता सरकारने काय करायचं ते ठरवावं.. बजरंग सोनवणे आणि अंजली दमानिया यांच्याबद्दल बोलले जात आहे, हे चुकीचं आहे.. मी कुणाचाच राजीनामा मागितला नाही,त्यामुळे महायुतीच्या मित्र पक्षातील लोकांच्या भूमिकेमुळे सकारात्मक निर्णय घ्यावा..हीच आमची अपेक्षा आहे..
त्या मुलीचे अश्रू पाहून तरी सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा, मुख्यमंत्री पण काल बोलले आहेत की ते कोणाला ही सोडणार नाही. अशोक चव्हाण यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता, मग आता सरकारने काय करायचं ते ठरवावं.. बजरंग सोनवणे आणि अंजली दमानिया यांच्याबद्दल बोलले जात आहे, हे चुकीचं आहे.. काही विषय असे आहेत ज्यात राजकारण बाजूला ठेवून माणूसकीच्या नात्याने हाताळावे, हा जर थोर पुरुषांचा राज्य आहे तर त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे.
यामध्ये विश्वासाचा किरण एकचं आहे की हे प्रकरण आता महाराष्ट्र नाही तर संपुर्ण भारत हे प्रकरण जगासमोर आणत आहे. त्याचसोबत सगळ्या पक्षाचे लोक मन आणि मतभेद बाजूला ठेवून या प्रकरणात आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून एकत्र आले आहेत. हे एक आशेच किरण आहे की, महाराष्ट्र अजून ही सुसंस्कृत आहे. आता निर्णय काय घ्यायचा हे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षाने ठरवायचं आहे.
अनेकजण मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. मी कुणाचाच राजीनामा मागितला नाही,त्यामुळे महायुतीच्या मित्र पक्षातील लोकांच्या भूमिकेमुळे सकारात्मक निर्णय घ्यावा..हीच आमची अपेक्षा आहे..सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, असं आव्हान सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलेलं आहे.