छगन भुजबळांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

भुजबळांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांची नाराजी हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या मनात काय सुरू आहे हे कसं समजणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर मी नाराज नसल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिले आहे.

भुजबळ सर नाराज आहेत, असं माझ्या कानावर काही नाही आलं. विधानसभेला, लोकसभेला किती सीट देणार हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com