व्हिडिओ
सुप्रिया सुळे यांनी खासदार भास्कर भगरे यांना बांधली राखी
खासदार सुप्रिया सुळे या नाशिकच्या चांदवड येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आल्या होत्या.
खासदार सुप्रिया सुळे या नाशिकच्या चांदवड येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आल्या होत्या. पिंपळगाव बसवंत येथे खासदार भास्कर भगरे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा दाखल होत सुप्रिया सुळे यांनी खा.भास्कर भगरे यांनी राखी बांधली. याचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नाशिक दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे (@BhaskarBhagare) यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. याप्रसंगी भगरे कुटुंबिय उपस्थित होते. सर्वांना भेटून आनंद झाला.