Suresh Dhas On CM Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास; आमची कामं करणार

सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुर्ण विश्वास व्यक्त केला आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या बाबतीत आमचे मुख्यमंत्री काम करतील असे त्यांनी म्हटले आहे.
Published by :
Prachi Nate

सुरेश धस यांची फूड अ‍ॅण्ड ड्रग्स अ‍ॅडलट्रेशन अ‍ॅक्ट या कायद्याबाबत चर्चा करणार त्याचसोबत सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुर्ण विश्वास व्यक्त केला आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या बाबतीत आमचे मुख्यमंत्री काम करतील असे त्यांनी म्हटले आहे. याचपार्श्वभूमीवर सुरेश धस म्हणाले की, आयुष्यातला सर्वात मोठा क्षण एवढा चांगला क्षण आज आहे.

आजच्या सारखा सुंदर क्षण आम्हाला पुन्हा भेटू शकत नाही आणि फेस टू फेस बोलून फूड अ‍ॅण्ड ड्रग्स अ‍ॅडलट्रेशन अ‍ॅक्ट बाबत जर काही बोलता आलं तर बोलू, कारण केंद्र सरकारने त्याच्यामध्ये 2006ला मनमोहन सिंग असताना हा कायदा आला. याच्यामध्ये 1954नंतर एकही अमेंडमेंट या कायद्यामध्ये नव्हती.

पुढे जी सुरेश धस म्हणाले की, अमेंडमेंट झाली ती जनतेच्या बाजूने होण्याऐवजी या युपीएच्या सरकारमध्ये चुकीची झाली होती, आणि ती दुरुस्ती आता करावी. कारण, त्याचे रिझल्टस 2011 पासून पुढे आलेले आहेत. त्याच्याबाबतीत आम्ही बोलू.. मराठवाड्याच्या विकासाच्या बाबतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे... आमचे मुख्यमंत्री काम करतील... असं सुरेश धस म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com