Sushilkumar Shinde On Ashok Chavan: चव्हाणांच्या राजीनाम्यावर सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राजीनामा दिल्यानंतर जर त्यांना भारतीय जनता पक्षमध्ये यायचं असेल पक्षाची ताकद वाढवायला जर कोणी पक्षामध्ये येत असेल तर त्याचं स्वागत केले पाहिजे. वास्तविक आता त्यांनी आता का राजीनामा दिला तो त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांनी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शेवटी त्यांना त्यांच्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून त्यांना काही राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये यावं आम्ही त्यांचं स्वागत करतो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com