राहुल गांधींना दिलासा; अंधारेंचा मोदींवर हल्लाबोल

राहुल गांधीच्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिलासा देत 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. आज मोदी आडनावाप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावरच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेला दिलासा हा आशादायक असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. एका आडनावावर काही बोलल्याने एका पक्षप्रमुखावर एवढी मोठी कारवाई केली जाते आणि संत-महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जातो, यावर सरकार काहीही कार्यवाही करत नाही, असे म्हणत सुषमा अंधारेंनी सरकारवर देखील हल्लाबोल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com