Navi Mumbai : नवी मुंबईतून पुढच्या वर्षी टेकऑफ, विमानतळाचे 63 टक्के काम पूर्ण

देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre

देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. 31 मार्च 2025 मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार कामाने वेग घेतला असून आतापर्यंत 63 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. तसेच यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएपीए) अदानी समूहाद्वारे रायगड जिल्ह्यातील पनवेल नजीकच्या 1600 हेक्टर जागेवर हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. यात सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. या प्रकल्पासाठी 19 हजार 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. दरम्यान, सध्या पहिल्या दोन टप्प्याच्या कामावर भर दिला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com