Talathi Exam: तलाठी उमेदवारांची उद्या ‘वाहतूक परीक्षा’, बंदमुळे एसटीसह इतर वाहतूक व्यवस्था कोलमडणार?

तलाठी उमेदवारांची उद्या ‘वाहतूक परीक्षा’, बंदमुळे एसटीसह इतर वाहतूक व्यवस्था कोलमडणार?
Published by  :
Team Lokshahi

तलाठी उमेदवारांची उद्या ‘वाहतूक परीक्षा’, बंदमुळे एसटीसह इतर वाहतूक व्यवस्था कोलमडणार? जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बंद पुकारण्यात आलाय. नेमक्या याच दिवशी राज्यभरात तलाठी भरती परीक्षा नियोजित केले. हजारो विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र मिळालेत. उद्याच्या बंदमुळे एसटी सेवा, इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता असून, तलाठी भरती परीक्षेच्या उमेदवारांची गैरसोय होणार. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्याची परीक्षा तातडीने पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून समोर येते आहे. याबाबत शासनाकडून तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com