व्हिडिओ
Talathi Bharti Paper Leak : पेपरफुटीमागं सरकारमधील नेता नाही ना? - रोहित पवार
राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरती परिक्षेदरम्यान पेपर फुटला. तलाठी भरती परीक्षेच्या पेपरफुटीवर आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरती परीक्षेदरम्यान पेपर फुटला. तलाठी भरती परीक्षेच्या पेपरफुटीवर आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. सातत्याने होत असलेल्या पेपरफुटी मागे एखादा राजकीय नेता असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे आहे? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. भरती परीक्षांच्या शुल्कावरूनही पवारांनी यापूर्वीच आरोप केले होते. त्यातच भरती परीक्षेचे पेपर फुटल्याने रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत.