Teacher Protest: राज्यातील शिक्षकांच प्रलंबित मागण्यांसाठी आज शाळा बंद आंदोलन
राज्यातील शिक्षक आजपासून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येत आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने हे एल्गार पुकारण्यात येत आहे. राज्यातील शिक्षकांचा आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं आहे. आंदोलनात शिक्षकांसद संस्थाचालक सहभागी होणार. १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा, शिक्षणसेवा कायमस्वरुपी रद्द करा, जुने पेंशन लागू करा अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईत समायोजन करा या आणि इतर मागण्यांसाठी शिक्षकांचे हे आंदोलन आहे.
शाळा बंद आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुख्यध्यापक, शिक्षक, संस्थाचालक सहभागी होणार आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात येणार ज्येष्ठ समाजवादी नेते माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीय संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे.
आज राज्यव्यापी शिक्षक आंदोलनामुळे शाळा बंद आहेत, मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्थाचालक सहभागी.
शिक्षक मागण्या पूर्ण न झाल्याने एल्गार पुकारत आहेत, ज्यात पेंशन, शिक्षणसेवा कायमस्वरुपी करणे आणि मुंबईतील अतिरिक्त समायोजनांचा समावेश आहे.
माजी शिक्षक आमदार आणि शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहेत.
