Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

एकिकडं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरु होत्या त्यावेळी घाटकोपरमध्ये राडा सुरु होता.
Published by :
Sakshi Patil

ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मिहिर कोटेच्या यांच्या घाटकोपरच्या कार्यालयासमोरच्या इमारतीत काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी करत राडा केला. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलं. पोलिसांनी पैशांच्या बॅगा लपवल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.

घटनास्थळी निवडणूक आयोगाचं पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. एकिकडं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरु होत्या त्यावेळी घाटकोपरमध्ये राडा सुरु होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com