ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडचा आज संयुक्त मेळावा

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मुंबईत आज संयुक्त मेळावा होणार आहे
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा(Sambhaji Brigade) मुंबईत आज संयुक्त मेळावा होणार आहे. हा मेळावा रंग शारदा सभागृह वांद्रे येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांना तसेच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युती मागच्या काही दिवसापूर्वी झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात एकत्र लढण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यामध्ये सर्व शिवसैनिकांना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com