व्हिडिओ
Dharavi Redevelopment : सुपारी घेऊन धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ठाकरेंचा विरोध; फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरे गटाला धारावीतील गरिबांना घरं मिळू द्यायची नाहीत' असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेतात असे देखील आरोप आणि टीका फडणवीसांनी केली आहे.
'ठाकरे गटाला धारावीतील गरिबांना घरं मिळू द्यायची नाहीत' असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेतात असे देखील आरोप आणि टीका फडणवीसांनी केली आहे. 'आम्ही धारावीकरांना पक्की घरं देणार म्हणजे देणार' 'या मोर्चाचा काही परिणाम होणार नाही' नवीन कंत्राटदारांच्या सगळ्या अती शर्ती उद्धव ठाकरे यांनीच ठरवलेल्या आहे असं फडणवीस म्हणाले. धारावी पुनर्विकासाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट काढत असलेल्या मोर्चावरून देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्ला चढवला आहे. TDR लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. धारावी विकासाबाबत ठाकरेंची भूमिका दुटप्पी आहे. ठाकरेंच्या काळात ठरलेल्या अटी आणि शर्तींनुसारच विकासकाची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला.