Raigad Fort : किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय

तिथीनुसार आज 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर अवतरली आहे. किल्ले रायगडावर शिवशाही अवतरली असल्याचं पाहायला मिळतंय.
Published by :
Dhanshree Shintre

तिथीनुसार आज 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर अवतरली आहे. किल्ले रायगडावर शिवशाही अवतरली असल्याचं पाहायला मिळतंय. स्वराज्याच्या राजधानीत शाहिरांनी रात्र जागवली आहे. मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी राजसदरेला मानवंदना देखील देण्यात आली आहे. किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल झाले आहेत.

साडेतीनशे वर्षांनंतर पून्हा एकदा त्याच ऐतिहासिक जागेवरती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय. या पार्श्‍वभूमीवर किल्ले रायगडावरील राजसदरेत राज्याभिषेक सोहळ्याचे नाट्य सादर करण्यात आले. यावेळी शिवशाहिरांनी डफावरती साज चढवत शिवगुण असणारे पोवाडे सादर करत इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला. या शाहिरी पोवाड्याच्या आवाजाने वातावरण भारावले होते, तर राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी राज सदरेत शिवकालीन मर्दानी खेळांचे थरारक प्रत्याक्षिके सादर केली. ज्यांनी उपस्थित शिवप्रेमींच्या अंगावर शहारे आणले तलवारबाजी, दानपट्टा, लाठीकाठी, भालाफेकसारखी मर्दानी खेळ मोठ्यांसह लहानग्यांनी सादर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com